महाराष्ट्र डाक विभाग भरती २०२४ - Maharashtra Dak Vibhag Bharti 2024

 महाराष्ट्र डाक विभागात 44000+ जागांसाठी मेगा भरती 2024 जाहीर!

Maharashtra Dak Vibhag Bharti 2024 : Maharashtra Post Office GDS BPM ABPM Recruitment 2024

महाराष्ट्र पोस्ट ऑफिस भरती 2024: भारतीय डाक विभागामार्फत GDS-ब्रांच पोस्ट मास्टर (BPM), GDS-असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (ABPM) इ. पदांच्या ३१७० जागांसाठी महाराष्ट्र सर्कल मध्ये भरती 2024 जाहीर झाली आहे. सदर पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवार 10वी उत्तीर्ण/ बेसिक संगणकाचे ज्ञान असावे. पात्र उमेदवाराने शेवट तारीख 05 ऑगस्ट 2024 च्या आत अधिकृत वेबसाईट indiapost.gov.in ला भेट देऊन अर्ज करा. अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंकचा उपयोग करा.


महाराष्ट्र डाक विभाग भरती २०२४ - Maharashtra Dak Vibhag Bharti 2024 : Maharashtra Post Office GDS BPM ABPM Recruitment 2024


महाराष्ट्र डाक विभाग भरती २०२४: संपूर्ण माहिती

महाराष्ट्र डाक विभागाने २०२४ साठी ग्राम डाक सेवक (GDS) पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर केली आहे. या भरतीद्वारे ३१७० पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा.


डाक विभाग भरती २०२४ पदांची माहिती

  • शाखा पोस्टमास्टर (Branch Postmaster - BPM)
  • सहायक शाखा पोस्टमास्टर (Assistant Branch Postmaster - ABPM)
  • डाक सेवक (Gramin Dak Sevak - GDS)

महाराष्ट्र पोस्ट ऑफिस भरती २०२४ शैक्षणिक पात्रता

  • १०वी उत्तीर्ण: उमेदवारांनी गणित आणि इंग्रजी विषयांसह १०वी उत्तीर्ण केलेली असावी.
  • इतर पात्रता:
  • संगणक ज्ञान
  • सायकल चालवण्याचे ज्ञान
  • उदरनिर्वाहाचे पुरेसे साधन

महाराष्ट्र ग्रामीण डाक सेवक भरती २०२४ वयोमर्यादा

  • १८ ते ४० वर्षे (१ ऑगस्ट २०२४ रोजी)
  • आरक्षित वर्गांसाठी वयात सूट: SC/ST: ५ वर्षे, OBC: ३ वर्षे

डाक सेवक भरती २०२४ अर्ज प्रक्रिया

  1. नोंदणी: खाली दिलेल्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन नोंदणी करावी.
  2. फी भरावी: सामान्य/OBC उमेदवारांसाठी ₹१००/- फी आहे. SC/ST/PWD/महिला उमेदवारांसाठी फी नाही.
  3. ऑनलाइन अर्ज: सर्व आवश्यक माहिती आणि दस्तऐवज अपलोड करून अर्ज सादर करावा.

महाराष्ट्र पोस्ट जीडीएस भरती २०२४ निवड प्रक्रिया

  • गुणवत्तेनुसार निवड: उमेदवारांची निवड १०वीच्या गुणांवर आधारित मेरिट लिस्टद्वारे केली जाईल.

ब्रांच पोस्ट मास्टर भरती २०२४ वेतनश्रेणी

  • सहायक शाखा पोस्टमास्टर / डाक सेवक: ₹१०,०००/- ते ₹२४,४७०/-
  • शाखा पोस्टमास्टर: ₹१२,०००/- ते ₹२९,३८०/-

महत्वाच्या तारखा

  • ऑनलाइन अर्ज सुरू: १५ जुलै २०२४
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख: ५ ऑगस्ट २०२४

अधिक महत्वाच्या लिंक